शेतीची नांगरणी करण्यासाठी शेतकऱ्याचा जुगाड,बाईकपासून बनवलेल्या ट्रॅक्टरचा Video

0
32

कतेच एका व्यक्तीने स्प्लेंडरला बॅटरी जोडून इलेक्ट्रीक बाईक बनवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच आता आणखी एक स्प्लेंडरशी संबंधित व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्याने जुन्या बाईकपासून चक्क ट्रॅक्टर बनवला आहे. शिवाय हा ट्रॅक्टर देखील असा आहे की, तो शेतकऱ्यांची शेतातील अनेक कामे सोप्पी करत आहे. बाईकपासून बनवलेल्या या जुगाडू ट्रॅक्टरच्या व्हायरल व्हिडिओमध्ये, एका शेतकऱ्याने आपल्या जुन्या स्प्लेंडर बाईकच्या साह्याने एक मिनी ट्रॅक्टर बनवल्याचं दाखवण्यात आलं आहे.