Video : डर के आगे जीत है.. शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी

0
20

सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच हा आश्चर्यचकीत करणारा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना विश्वास बसणार नाही.
हा व्हायरल व्हिडीओ एका शेतातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरण चक्क चित्ताबरोबर सेल्फी काढताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुण हातात फोन घेऊन सेल्फी काढत आहे आणि त्याच्या पायाच्या शेजारी चक्क चित्ता बसला आहे. विशेष म्हणजे चित्ता सुद्धा शांतपणे सेल्फी काढताना दिसतो. सुरूवातीला व्हिडीओ पाहताना तुम्हाला वाटेल की हा तरुण कुत्र्याबरोबर सेल्फी काढतोय पण नंतर नीट पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की हा कुत्रा नव्हे तर चित्ता आहे. व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. काही लोकांना विश्वास बसणार नाही की इतक्या शांतपणे हा तरुण चित्ताबरोबर सेल्फी कसा काढतोय.