परिस्थिती बदलली तर २०२४ ला शरद पवार देशाचे पंतप्रधान…

0
20

राजकारणातील ज्येष्ठ नेते, संयमी राजकारणी आणि साहित्यिक म्हणून ओळख असलेले यशवंतराव गडाख यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या भेटीला आले. वाढदिवसानिमित्त प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गडाख यांनी मात्र ठाकरे यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेही कौतुक केले. सध्या तरी देशात शरद पवार यांच्याएवढा दुसरा अनुभवी नेता नाही. त्यामुळे परिस्थिती बदलली तर २०२४ नंतर पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकतील, असेही गडाख म्हणाले.

गडाख म्हणाले, ऐंशी पार केल्यानंतरही शरद पवार राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांची एकूण कारकीर्दही संघर्षमय आहे. मात्र, त्यांनी कधीही हार मानली नाही. आजारपण किंवा वयाचे कारण देऊन ते थांबले नाहीत. या वयातही ते लोकांमध्ये जातात. या वयात अशी हिंमत दाखविणारा कदाचित ते शेवटचा नेता ठरतील. म्हणूच राज्याच्या नव्हे देशाच्या राजकारणातही त्यांचे वजन आहे. हाच विचार करता परिस्थिती बदलली तर २०२४ नंतर ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. आतापर्यंत त्यांना हे पद मिळाले नाही, याला कारण दिल्लीतील काँग्रेसमधील चौकडी आहे. त्यांच्याकडून पवारांबद्दल श्रेष्ठींचे काम भरले जात. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडत असे. आम्ही मात्र त्यांच्या कायम पाठीशी राहिलो. नरसिंहराव यांच्यावेळीही आमची पसंती पवारांनाच होती, असेही गडाख म्हणाले.