गणेश सहकारी साखर कारखान्यात विखे गटाचा दारूण पराभव,खा. डॉ. विखे म्हणाले.

0
26

गणेश सहकारी साखर कारखान्यात विखे गटाचा दारूण पराभव झाला याबाबत खा. डॉ. विखे यांना विचारले असता ते म्हणाले, सभासदांना काय योग्य वाटते, त्यांना कोणाकडून अपेक्षा असते त्यानुसार सभासदांनी कौल दिलेला आहे आणि तो कौल आम्ही अतिशय नम्रपणे मान्य केला आहे. 25 वर्षांपूर्वीपासून हा कारखाना आमच्या विरोधातच राहिलेला आहे त्यामुळे आता विरोधात निकाल गेल्याने वेगळे काही झाले असे नाही. सहकारामध्ये राजकारण होऊ नये ही आमची अपेक्षा होती पण ते झाले. तिथे सभेमध्ये अनेक भाषणे झाली. त्यातील वाक्यरचना, भाषा सर्व जनतेने ऐकली. मात्र त्या भाषणांमधून जिल्ह्याच्या जनतेला काय वाटते त्यात काय राजकारण आहे ते जिल्ह्यातील नागरिक ठरवतील. त्यावर फार काही टीका टिप्पणी करण्यासारखं नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.