Garud Puran
गरूड पुराण…
खूप वेळ झोपून राहणे
ज्या घरांमध्ये लोक जास्त वेळ झोपतात त्या घरांवर लक्ष्मीची कृपा कधीच होत नाही. हे लोक ना आयुष्यात प्रगती करतात आणि ना त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात. त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नाही.
मळके कपडे घालणे
गरुड पुराणानुसार, देवी लक्ष्मी फक्त अशा लोकांनाच आशीर्वाद देते जे स्वच्छ राहतात. ज्याचे कपडे आणि नखे स्वच्छ असतात आणि जे दररोज अंघोळ करतात. घाणेरड्या लोकांवर लक्ष्मी कधीच दया करत नाही. असे लोक गरिबीने ग्रासलेले असतात.
स्वयंपाकघरात उष्टी आणि खरकटी भांडी ठेवणे
रात्री किचन अस्वच्छ ठेवल्याने, किचनमध्ये घाण भांडी सोडल्याने देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मी नाराज होतात. अशा घरात कधीच समृद्धी येत नाही आणि त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे झोपण्यापूर्वी नेहमी स्वयंपाकघर स्वच्छ करावे.






