gas cylinder…वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये आता महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे घरगुती 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पन्नास रुपयांच्या वाढीसह घरगुती सिलिंडरचे दर आता 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच इथून पुढे एका सिलिंडरसाठी हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सिलिंडरचे दर महागल्याने गृहिनीचे बजेट कोलमडण्याची शक्यात आहे. एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते. व्यवसायिक सिलिंडर पाठपाठ आता घरगुती गॅसच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.
IAS पूजा सिंघल यांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी, नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन… व्हिडिओ