गौतम गंभीर आणि विराट कोहलीमध्ये बॉक्सिंग मॅच… व्हायरल व्हिडीओ

0
23

विराट आणि गंभीर यांच्यामध्ये गेली १० वर्ष हा वाद सुरू आहे. आता हा वाद कधी मिटेल? हे तर काळच ठरवेल. पण सध्या या दोघांच्या भांडणावर तयार करण्यात आलेला व्हिडीओ गेम मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही विराटची RCB आणि गंभीरची LSG या दोन टीम समोरासमोर उभ्या राहिलेल्या पाहू शकता. मग हे दोन्ही टीम्सचे खेळाडू अक्षरश: धावत जाऊन एकमेकांवर हल्ले करतात. लाथा-बुक्के मारतात. बॅटने एकमेकांना बडवून काढतात. दरम्यान हा व्हिडीओ गेम कसा तयार करण्यात आला याबद्दलही व्हिडीओमध्ये माहिती दिली जाते. व्हिडीओच्या शेवटी गौतम गंभीर जिंकल्याचं दाखवलं जातं. पण अर्थात हा व्हिडीओ गेम असल्यामुळे कोहली चाहते पुढच्या राऊंडमध्ये गंभीरला हरवून स्कोअर लेव्हल करू शकतात.