नगर – रविवार दि. 8 मे 2022 रोजी घारगाव (श्रीगोंदा) येथील श्री महादेव यात्रा उत्सवानिमित्त यात्रा उत्सव कमिटीने दोन वर्षानंतर भव्य निकाली कुस्त्या आखाडा रंगणार आहे. तरी आपल्या नगर जिल्ह्यातील नामवंत पैलवानांनी सहभाग घ्यावा व आखाडा अजून रंगतदार करावा, असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.
कोरानामुळे दोन वर्षे घारगावची यात्रा, कुस्त्यांचा हगामा झालाच नाही. यंदा मात्र गावातील जागृत महादेवाची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा निर्णय घारगाव यात्रा उत्सव कमिटी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांनी घेतला आहे.
रविवारी सकाळी महादेवास अभिषेक होऊन, दुपारी 3 वा. कुस्त्यांचा आखाडा सुरु होईल. वजन गटात कुस्तीचा आखाडा असल्याने सर्व पैलवानांनी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत वजन घेतले जाईल. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
————