महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर आता गोव्यातील काँग्रेस आमदारांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नऊ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार आहेत. ९ आमदार भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसकडे फक्त दोनच आमदार राहतील.
गोव्यात काँग्रेसचे अनेक आमदार फुटून भाजपमध्ये येतील या बातमीचे काँग्रेसच्या प्रभारींनी खंडन केले आहे. या सर्व बातम्या अफवा असल्याचे काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव म्हणाले. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी गोव्यातील राजकारण तापले आहे.






