Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल Gold- Price :सोन्याच्या भावात आता घसरण,जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

Gold- Price :सोन्याच्या भावात आता घसरण,जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

0
18

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,२९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६३,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७०,६३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,०९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५६,९९८ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,१८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,९९८ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,१८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,९९८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,१८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,९९८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,१८० रुपये आहे.