१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६०,४०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६०,३४० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७५,८९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,८५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,३४० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,३८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३८४ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३४८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३४८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३८० रुपये आहे.