Gold- Price सोन्याचे दर…१० ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

0
42

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५८,३३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५८,२६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ६८,२९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६८,५७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ५३,४६९ प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५८,३३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,४६९ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,३३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,४६९ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,३३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,४६९ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,३३० रुपये आहे.