१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,२८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,४३० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७४,३५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४,७४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,३८० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,२८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,३४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,२८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,३३१ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,२७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,३३१ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,२७० रुपये आहे.