१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६१,३६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६०,०१० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७७,२९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,४०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५६,२४७ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६१,३६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,२५६ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,३७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,२५६ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,३७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,२९३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,४१० रुपये आहे.