आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,६०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,८६० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,६०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,९३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,०३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,०३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७०० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,०३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१९ रुपये आहे.