आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,९६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,९६० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,३२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,३७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,३७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,८१० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,३७० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१० रुपये आहे.