Google वर ‘या’ गोष्टी Search केल्यास जेलवारी नक्की, आधीच काळजी घ्या…

0
1069

Google Search..
तुम्ही गुगलवर काय सर्च करत आहात, यावर बरंच लक्ष ठेवलं जातं. त्यात सुरक्षा आणि संरक्षण दलाचाही समावेश आहे. अशा स्थितीत तुम्ही एखादी आक्षेपार्ह गोष्ट शोधताना आढळलात तर, पोलिसांची टीम त्याचा मागोवा घेते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या इंटरनेटवर सर्च करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. अशा परिस्थितीत या गोष्टींचा शोध घेणं टाळावं.

बॉम्ब कसा बनवायचा,हे गुगलवर सर्च केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. असं केल्यानं तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर याल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा परिस्थितीत गुगलवर कधीही बॉम्ब बनवण्याची पद्धत शोधू नका किंवा त्याच्याशी संबंधित इतर कोणतीही सामग्री शोधू नका.

लहान मुलांच्या शोषणाशी संबंधित असा कोणताही मजकूर तुम्ही गुगलवर शोधला, तर असं करणं आपल्याला तुरुंगातही पोहचवू शकतं. भारतीय कायद्यातही यासाठी तरतूद आहे. तुम्हाला पॉक्सो कायद्यानुसार तुरुंगात टाकलं जाऊ शकतं. अशा सामग्रीचा शोध घेतल्यास तुम्हाला पाच ते सात वर्षे तुरुंगवास भोगावा लागू शकतो.