या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नसोहळ्याच्या हळदीमध्ये आजीसोबत तिच्या नाती सुद्धा नाचल्या आहेत. पाच सहा तरुणींसोबत पिवळ्या रंगाची नववारी साडी नेसलेल्या आजी डान्स करत आहेत.पण या आजीच्या डान्सपुढे नातीचा डान्स देखील फिका पडला आहे. आजीने नववारी साडी नेसून डोक्यावर पदर घेत अशा काही डान्सच्या स्टेप केल्या आहेत जे पाहून सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. आजीचा हा जबरदस्त डान्स पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.आजीचा हा नागिन डान्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
लग्नात आजीचा झिंगाट डान्स😀#viralvideo #aajidance #zingaat pic.twitter.com/mHaIu8OqYF
— Susaaat (सुसाट) (@akshaylondhe60) May 21, 2023






