सोशल मीडियावर हाताने पंखा बंद करणारे बाबा, गरम तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देणारे बाबा असे वेगवेगळे प्रकार व्हायरल झाले होते. पण आता चक्क ‘गवत बाबा’ चर्चेत आले आहेत. हायरल गवत बाबा चक्क स्वतःच्या डोक्यावर गवत उगवून फिरताना दिसत आहेत. गवत बाबा सांगतात की ते आपल्या डोक्यावर धान्य टाकून हे असं गवत उगवतात, त्यांचे डोके व केस हे या गवतासाठी माती व खताचे काम करतात. रोजच्या जसे आपण शरीरासाठी पाणी पितो तसे ते या गवतासाठी डोक्यावर ग्लासभर पाणी ओतून घेतात. काहीवेळा तर या गवताची मुळे त्यांच्या त्वचेचं आत सुद्धा जाण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी तेव्हा कित्येकदा फाटली आहे. कधी कधी यातून रक्त पण येतं. यामुळे झोपताही येत नाही, असंच बसल्या बसल्या हातावर डोकं ठेवून आराम करता येतो, असेही ते सांगतात पण तरीही देव जाणे कसली हौस म्हणून ते हा प्रकार सातत्याने करत आहेत.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल आता आले ‘गवत’ बाबा…डोक्यावर उगवतात गवत, मुळं थेट त्वचेत जातात..व्हिडिओ