गुजरात निवडणुकीत नेमके काय घडले? सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ व्हायरल…

0
155

सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप @iPandeyShweta ट्विटर हँडलवर हसणाऱ्या इमोजीसह “गुजरात निवडणुकीचे निकाल समजून घ्या” या कॅप्शनने शेअर करण्यात आली आहे. या क्लिपला ८० हजारांहून अधिक व्ह्यूज आणि सुमारे अडीच हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. क्लिप पाहिल्यानंतर अनेक युजर्स हसून लोटपोट होत असल्याचेही कमेंटमध्ये दिसतंय. काहींनी तर असेही लिहिले आहे की गुजरात निवडणुकीच्या निकालाचे हे सर्वोत्तम स्पष्टीकरण आहे. वास्तविक, ही क्लिप अभिनेता सलमान खान आणि आमिर खान यांच्या ‘अंदाज-अपना-अपना’ या प्रसिद्ध चित्रपटातील आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालांना लक्षात घेऊन ती एडिट करण्यात आली आहे. परेश रावल यांच्याजागी PM मोदींचा चेहरा लावण्यात आला आहे.