एका प्रेमी जोडप्यानं कुटुंबीयांच्या विरोधामुळे थेट आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. अखेर मुलांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना त्यांची चूक लक्षात आली. या मुलांचं एकमेकांवर किती प्रेम होतं याची जाणीव त्यांना झाली. मग काय आपली चूक सुधारण्यासाठी कुटुंबीयांनी मृत्यूनंतर त्यांचं लग्न लावून दिलं. या आगळ्या वेगळ्या लग्नाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार मुलांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचं डोकं ठिकाणावर आलं. त्यांना त्यांची चूक लक्षात आली. मग आपली चूक सुधारण्यासाठी त्यांनी दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मातीपासून दोघांचे पुतळे तयार केले. अन् पुतळ्यांचं मोठ्या जल्लोषात लग्न लावून दिलं. लग्नात केल्या जाणाऱ्या सर्व विधी त्यांनी केल्या.
एक विवाह ऐसा भी….#गुजरात: छह माह पहले घरवालों के शादी से इनकार करने पर गणेश और रंजना ने एक-दूसरे को गले लगाकर आत्महत्या कर ली थी।
प्रायश्चित करने के लिए दोनों परिवारों ने प्रेमी जोड़े की प्रतिमा बनाकर उनके पुतलों की शादी करा दी है।#Gujrat #MarriedCouple #ViralVideos pic.twitter.com/BoI01sUcxz
— Dp Rathi (@rathi_dp) January 19, 2023






