Gujrat Bjp…500 डॉक्टरांनी केला भाजपमध्ये प्रवेश

0
483
Gujrat Bjp doctors joins party

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमधील जवळपास 500 डॉक्टरांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये डॉक्टरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय राहावेत अशी आमची इच्छा आहे. आम्ही 1 मे ते 4 मे या कालावधीत कोणताही कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण 1 मे ही सार्वजनिक सुट्टी होती. यानंतर कार्यकर्ते गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. पुढील 6 महिने सर्व कार्यकर्त्यांनी न थांबता काम करायचे आहे, कारण आम्हाला आमचे सर्वश्रेष्ठ देण्याची गरज आहे, असे गुजरात भाजपचे अध्यक्ष सी.आर.पाटील यांनी म्हटले आहे.