गुंडेगाव विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी सौ.संगिता शिंदे यांची नियुक्ती…

0
375

तालुका प्रतिनिधी – गुंडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी श्रीमती नेहूल सेवानिवृत्त झाल्यामुळे नव्याने मुख्याध्यापक म्हणून सौ.संगिता शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.सौ.शिदे यांनी देहरे येथून आपल्या कारकीर्दला सुरुवात केली त्यानंतर त्यांची बदली मेहकरी, तिसगाव व घोडेगाव येथे झाली या २९ वर्षाच्या नोकरीच्या काळात त्यांनी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना घडवण्याचे काम केले आहे.
यावेळी गुंडेगावच्या वतीने आयोजित छोटेखानी सत्कार कार्यक्रम विद्यालयात करण्यात आला या सत्कार प्रसंगी बोलताना सौ.शिंदे यांनी भविष्यात विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न राहील तसेच विविध उपक्रम राबविण्यात येऊन कलागुणांना वाव दिला जाईल,स्पर्धा परीक्षा, विविध मैदानी खेळाच्या माध्यमातून खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्नशील राहील,विद्यार्थी विद्यार्थिनी संख्या वाढीवर भर देणे,डिजीटल शिक्षण,या गोष्टीवर अधिक भर दिला जाईल असे मत मुख्याध्यापक सौ.शिदे यांनी व्यक्त केले.
यावेळी समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी, माजी संस्था निरिक्षक रंगनाथ भापकर सर यांनी शाळेला भविष्यात गावच्या वतीने सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले व आपल्या शाळेला ५० वर्ष पूर्ण होत असल्याने भविष्यात माजी विद्यार्थी मेळावा घेऊन आर्थिक मदत तसेच शाळेच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण गोष्टींच्या माध्यमातून शाळेला फायदा घडवून आणला जाईल..
उपस्थितांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खंडू भिसे, सामाजिक कार्यकर्ते सतिश काका चौधरी,मा.ग्रामपंचायत सदस्य मंगेश हराळ, संतोष कोतकर, संदिप धावडे, प्रदिप भापकर, संजय भापकर, दादासाहेब आगळे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मगर सर,अनिल कोतकर,लोखंडे मामा उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व ओळख गुंड सर यांनी करताना सांगितले सौ.शिंदे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही सुसंस्कृत असुन सासरे पी.आर.शिंदे हे अहमदनगर येथे उपशिक्षणाधिकारी होते तर पती सतिश शिंदे व मुलगा सिद्धार्थ शिंदे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत.सून सौ.रिचा शिंदे या डॉक्टर असून मुख्याध्यापक सौ.शिंदे एम.ए.बीएड आहेत.
शेवटी उपस्थित नागरीकांचे आभार साबळे पी.डी यांनी मानले…