Hardik Pandya Viral Video भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या टी २० सामन्यांचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याने एका खास पार्टीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हार्दिक पांड्याने न्यूझीलंड विरुद्ध दौऱ्यात मेन इन ब्ल्यूच्या टी २० संघाचे कर्णधारपद भुषवले. अष्टपैलू पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध १-० असा विजय मिळवला होता. यानंतर टीम इंडियाचा संघ भारतात परतला आहे. या विजयाचे सेलिब्रेशन करताना काल पांड्यासह टीम इंडियाचे आजी माजी खेळाडू पार्टी करताना दिसले. या पार्टीत पांड्यासह टीम इंडियाचा माजी कर्णधार. एम एस धोनी सुद्धा कमाल डान्स मूव्ह्ज करताना दिसला.
आपण पांड्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनीचा जलवा पाहू शकता. रॅपर बादशाह सुद्धा या व्हिडिओमध्ये गाणी गाताना दिसत आहे, तर टीम इंडियाचे खेळाडू एकदम कूल अंदाजात बादशाहच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.