पूरग्रस्त भागातील महिलेने आमदाराला कानशिलात लगावली… व्हिडिओ

0
22

हरियाणातील कैथलमध्ये जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार ईश्वर सिंह यांना एका महिलेनं चापट मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नव्हे तर येथील लोकांनी संबंधित आमदारासह कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीही केली आहे. आमदार ईश्वर सिंह हे चीका परिसरातील गुहला गावात पूरस्थितीची पाहणी करायला गेले होते. यावेळी गर्दीतून आलेल्या एका महिलेनं ईश्वर सिंह यांना चापट मारली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार ईश्वर सिंह गुहला गावात आले होते. यावेळी एका महिलेनं आमदाराच्या कानशिलात लगावली. तसेच ‘तू आता कशाला आला?’ असा सवालही पूरग्रस्त महिलेनं विचारला आहे.जेजेपी हा हरियाणामधील भाजपा सरकारचा सहकारी पक्ष आहे.