Health Tips Ayurveda… घरगुती उपायांनी पचनशक्ती वाढवा.. पोटाच्या समस्या राहतील दूर…

0
520

Health Tips Ayurveda

पचन योग्य प्रकारे होत नसेल, तर तुम्ही घेत असलेल्या पोषक आहाराचं पूर्ण पोषण तुम्हांला मिळत नाही. याशिवाय तुम्हांला अपचन, गॅस, आंबट ढेकर, बद्धकोष्ठता यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. काही आयुर्वेदिक उपायांचा वापर करुन तुम्ही तुमची पचनशक्ती वाढू शकते.

पचनाशक्तीसाठी आयुर्वेदिक उपाय

*लिंबाच्या रसामध्ये थोडे आले किसून टाका आणि त्यात चिमूटभर काळे मीठ मिसळा. जेवणापूर्वी याचं सेवन करा.
कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र खाऊ नका. म्हणजेच काकडी, कोशिंबीर जेवणासोबत खाऊ नये.
*दह्यात मीठ मिसळून त्यापासून रायता बनवून खाऊ नका. त्यापेक्षा दही काहीही न घालता वेगळं सेवन करा. दह्यात साखर घालून खाऊ शकता.
*रायता आणि कढी बनवण्यासाठी ताक वापरा.
*जेवताना इतर कोणतंही काम करू नका. तुमचे संपूर्ण लक्ष फक्त तुमच्या खाण्यावर असलं पाहिजे. असं केल्यानं पचनासाठी आवश्यक रसांचा समतोल राखला जातो.
*जेवणासोबत जिरे-हिंग मिसळून ताक घेतल्यानं फायदा होतो.
हरड्याच्या गोळ्या आणि पावडर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
*जेवणानंतर बडीशेप आणि साखर मिठाई खाल्ल्यानं पचनास मदत होते.
*वेळेवर झोपणे आणि उठणे यामुळे पचन शक्ती चांगली राहते.
*त्रिफळा चूर्णाचे सेवन केल्यानं पोट साफ राहते, पचनक्रियाची सुधारते.