लाहीलाही…स्वयंपाकासाठी गॅसची गरज नाही, तीव्र उन्हच करतय काम…. व्हिडिओ

0
1338

देशभरात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली आहे. अनेक शहरांमध्ये तापमान 44 अंशांच्या पुढे झाले आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिल्लीच्या भीषण उन्हात एक व्यक्ती सूर्याच्या उष्णतेच्या मदतीने अंड्याचे ऑम्लेट बनवताना दिसत आहे. दिल्लीच्या कडाक्याच्या उन्हात एक माणूस आपल्या घराच्या गच्चीवर सूर्याच्या उष्णतेच्या मदतीने पॅनमध्ये ऑम्लेट बनवत आहे. त्या व्यक्तीने गॅसवर नाही तर उन्हात ऑम्लेट बनवले हे पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

तुम्हाला एक व्यक्ती छतावर पॅन घेऊन उभी असलेली दिसेल. त्यानंतर तो त्यात तेल ओततो. तेल घातल्यावर तो पॅनमध्ये अंड फोडतो. आपण पाहू शकतो की उष्णतेमुळे, गरम केलेल्या पॅनमध्ये अंड सहज शिजण्यास सुरवात होते.