चिल्लर नको ऑनलाईन पेमेंट करा..पाहा पहिला ‘डिजिटल भिकारी’ Video

0
68

हा व्हिडीओ @jaggirm या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका तरुणाला भर गर्दीत भीक मागताना पाहू शकता. विशेष म्हणजे या तरुणानं भीक मागण्याची डिजिटल पद्धत स्विकारली आहे. तुमच्याकडे रोख चिल्लर नसेल तर तुम्ही फोनपे, डिजिटल वॉलेट आणि ऑनलाइन पेमेंट अॅपद्वारे त्याला पैसे देऊ शकता. हा प्रकार पाहून काही उत्साही मंडळी स्वत:हून पुढे येत त्याला डिजिटल भीक देत आहेत. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून नेटकरी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. या तरुणाला मुंबईतील पहिला डिजिटल भीकारी म्हटलं जात आहे.