नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्प 5 एप्रिलपासून कंपनी आपल्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमती 2,000 रुपयांपर्यंत वाढवणार आहे. खर्चाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दुचाकींच्या किमती वाढवणे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे. Hero motocorp
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “2,000 रुपयांपर्यंत केलेली ही वाढ मॉडेल आणि बाजारावर अवलंबून आहे.” 2022-23 या आर्थिक वर्षापासून केवळ हिरो मोटोकॉर्पच नाही तर टोयाटो किर्लोस्कर मोटार, ऑडी आणि BMW व्यतिरिक्त मर्सिडिज-बेंज या कंपन्यांनीही एप्रिल 2022 पासून खर्चाचा हवाला देत वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.