Hero MotoCorp कंपनीने Hero Glamour चे नवीन मॉडेल लाँच केले आहे. ही नवीन बाईक ड्रम आणि डिस्क या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्याची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 82,348 रुपये आहे. 2023 Hero Glamour मध्ये काही नवीन डिझाईन घटक देण्यात आले आहेत. नवीन ग्लॅमरमध्ये संपूर्ण डिजिटल क्लस्टर, रिअल टाइम मायलेज इंडिकेटर, कमी इंधन निर्देशक आणि एकात्मिक यूएसबी चार्जर आहे. या बाईकला 63 kmpl चा मायलेज मिळेल असा दावा करण्यात आला आहे.






