Hero Splendor भारतातल्या टू व्हीलर मार्केटमध्ये उत्तम मायलेज देणाऱ्या बाइक्स ही या कंपनीची खासियत आहे. कंपनीने नुकतंच त्यांच्या स्प्लेंडर या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइकचं नवीन व्हर्जन स्प्लेंडर प्लस एक्सटेक बाजारात दाखल केलं आहे.
नवीन Hero Splendor + ‘XTEC’ मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल मीटर, कॉल आणि एसएमएस अलर्ट, RTMI (रिअल टाइम मायलेज इंडिकेटर), फ्युएल इंडिकेटर, एलईडी लॅम्प, एक्सक्लुझिव्ह ग्राफिक्स, इंटिग्रेटेड यूएसबी चार्जर हे काही नवीन फीचर्स समाविष्ट केले आहेत. ज्यामुळे ही बाइक अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करेल, असा कंपनीला विश्वास आहे.
मोटारसायकलमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह सेगमेंट-फर्स्ट फुल डिजिटल मीटर देण्यात आला आहे. यामध्ये डिजिटल डिस्प्ले, इनकमिंग आणि मिस्ड कॉल अलर्ट, मेसेज अलर्ट, आरटीएमआय (रिअल टाइम मायलेज इंडिकेटर) आणि फ्युएल इंडिकेटर सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. यूएसबी चार्जिंग पोर्टही देण्यात आले आहेत.
ही बाइक चांगलं मायलेज देऊ शकते. त्यासाठी ही बाइक i3S पेटंट टेक्नोलॉजीसह सादर करण्यात आली आहे. नवीन मोटरसायकलस्पार्कलिंग बीटा ब्लू, कॅनव्हास ब्लॅक, टॉरनेडो ग्रे आणि पर्ल व्हाइट या चार पर्यायांमध्ये आहे.