Hina Rabbani Khar
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पाडला. शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात ३४ मंत्र्याचा समावेश आहे. सिनेटचे सभापती सादिक संजरानी यांनी मंत्र्यांना शपथ दिली. पाकिस्तानाच्या मंत्रिमंडळातील सर्वाधिक चर्चा हिना रब्बानी खार यांची झाली. हिना रब्बानी खार यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं आहे. हिना रब्बानी खार या त्यांच्या फॅशनमुळे चर्चेत असतात. हिना खार यांना परराष्ट्र राज्यमंत्री करण्यात आलं आहे.
हिना रब्बानी खान २०११ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांची खूप चर्चा झाली होती.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चेदरम्यान हिना रब्बानी खार भारतात आल्या होत्या त्यावेळी त्यांची खूप चर्चा झाली होती. भारत पाकिस्तान यांच्यातील चर्चेपेक्षा जास्त चर्चा हिना खार यांच्याबद्दल झाली होती. हिना खार यांनी सोबत आणलेली बिरकीन हँडबॅग सात लाख रुपये किमतीची होती.
बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो आणि हिना रब्बानी यांच्यात प्रेमप्रकरण असल्याच्या चर्चा सुरु होत्या.