चीनसह इतर अनेक देश आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस या चीनमधील नव्या व्हायरसनं जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते. आता नागपुरातही एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत.
एचएमपीव्ही व्हायरस हा धोकादायक व्हायरस नाही. तसेच हा व्हायरस भारतात आधीपासूनच अस्तित्वात असलेला व्हायरस असल्याचे मत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केलं आहे. प्रत्येक भारतीयांमध्ये या व्हायरसच्या विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज आहेत. त्यामुळे भारतीयांनी घाबरण्याची गरज नाही, असेही डॉ. शेखर मांडे म्हणाले. शिवाय या व्हायरसमुळे मृत्यूचा धोकाही नसल्याचं सीएसआयआरचे माजी डायरेक्टर जनरल डॉक्टर शेखर मांडे यांनी सांगितलय.
डॉ. शेखर माडेंची माहिती
-लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही
-कोरोना सारखा हा नवीन व्हायरस नाहीये
2001 मध्ये डिटेक्ट झाला होता.
त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.
या व्हायरस विरोधात लढण्यासाठी भारतीयांमध्ये अँटिबाडीज आहेत.
भारतात देखील हा व्हायरस नवीन नाही.
कोरोना सारखीच लक्षण आहे मात्र धोकादायक नाही
या व्हायरसमुळे मृत्यूचा धोका नाही.
नागरिकांना मास्क वापरण्याची शक्ती नाही. मात्र खबरदारी म्हणून
मास्क वापरू शकता.
जुनाच वायरस असल्यामुळे या वायरसचा फार धोका ना






