Hondaभारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. इलेक्ट्रिक कारचा वाढता वापर लक्षात घेता होंंडा मोटारसायकल सुद्धा लवकरच भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन येणार आहे. 2023 पर्यंत ही इलेक्ट्रिक स्कूट भारतात लॉन्च होणार आहे. या स्कूटरची आणखी वैशिष्ट्ये कोणती ते जाणून घेऊयात. HMSI आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी जपानच्या सहकार्याने काम करेल. आणि 2023 च्या सुरुवातीला कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर देशात लॉन्च करणार आहे. Honda च्या Activa स्कूटर ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे, तिचे प्रतिस्पर्धी TVS Jupiter आणि Hero Maestro Edge विक्रीच्या बाबतीत खूप मागे आहेत. इलेक्ट्रिक स्कूटरकडे लोकांचा वाढता कल लक्षात घेऊन कंपनी याकडे अधिक लक्ष देत आहे.