Honda Motorcycle and Scooter India लवकरच भारतात पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. भविष्यात इलेक्ट्रिक मोटरसायकल देखील लाँच करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अलिकडेच इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वाढली आहे. Honda पुढील वर्षी मार्च 2024 पर्यंत आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करेल.असे मानले जाते की, ती सर्वाधिक विक्री होणाऱ्या Activa चे इलेक्ट्रिक व्हेरियंट असू शकते. यानंतर, 2024 च्या अखेरीस स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची योजना आहे. मात्र, कोणते मॉडेल पहिले येईल याबाबत कंपनीने कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील वर्षाच्या अखेरीस होंडा आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक देखील लाँच करू शकते, जी स्पीड आणि रेंजच्या बाबतीत जबरदस्त असेल