हॉटेलमध्ये जेवणात केले जाते मापात पाप..आयएफएस अधिकाऱ्याने केली पोलखोल…व्हिडिओ

0
23

एका IFS अधिकाऱ्यानं हॉटेलमध्ये केल्या जाणाऱ्या या फसवणूकीची भांडाफोड केली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील झटकाच बसेल. अन् तुम्ही देखील हॉटेलमध्ये जेवताना थोडे सावध व्हाल. ‘भारतीय वन सेवा’ (IFS) अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका हॉटेलमध्ये एका लहानशा बादलीमधून डाळ दिली जात आहे. या बादलीची उंची मोठी दिसतेय. पण त्या तुलनेत डाळ मात्र फारच थोडीशी आहे. “याला तुम्ही एकप्रकारचा स्कॅमच म्हणणार का?” अशा आशयाची कॅप्शन IFS अधिकाऱ्यांनी या व्हिडीओवर दिली आहे. जेव्हा बादलीमध्ये चमचा बुडवला जातो तेव्हा तो अर्धा सुद्धा आतमध्ये जात नाही. पण बादलीची उंची मात्र चमच्याइतकी आहे.