भविष्यासाठी पैशाची बचत करायची? ‘या’ आहेत सहज करता येणाऱ्या गोष्टी…

0
33

पैसा वाचवायचा असेल, तर सुरुवातीला महिन्याचे बजेट ठरवा आणि त्या बजेटनुसार पैसा खर्च करा. बजेटच्या मदतीने पैसा कुठे जास्त खर्च करायचा आणि कुठे कमी ते तुम्हाला लगेच समजेल. मग त्यानुसार तुम्ही महिनाभराचे नियोजन करू शकाल.

तुम्हाला पैसे उसने घेण्याची सवय असेल, तर ती आताच सोडा. चुकूनही पैसे उसने घेऊ नका. आपल्या गरजेनुसार पैसा खर्च करा. उपभोगाच्या वस्तू खरेदी करताना आपली आर्थिक स्थिती समजून घ्या.

पैसा खर्च करताना स्वत:वर नियंत्रण ठेवा. कोणताही अवाजवी खर्च करू नका. ऑनलाइन शॉपिंग करणारे लोक विचार न करता खर्च करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात.

क्रेडिट कार्डमुळे तुम्ही अनेकदा संकटात येऊ शकता. त्यामुळे क्रेडिट कार्डाचा वापर नेहमी सावधगिरीने करावा.

पैशांची बचत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एसआयपी, म्युच्युअल फंड आणि योजनांमध्ये जास्तीत जास्त पैसा गुंतवा. दर महिन्याला तुम्ही यामध्ये पैसे गुंतवत असाल, तर दीर्घकाळासाठी तुम्हाला याचा फायदा होईल.