एक रेल्वे प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला एका पुरुषाला उचलून आपटते आणि नंतर त्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे व्हिडिओमध्ये महिलेने ज्या पुरुषाला मारहाण केली आहे, तो तिचा नवरा असल्याचे सांगितलं जात आहे. व्हिडीओत, स्टेशनवर असणारे इतर प्रवासी नवरा-बायकोची हाणामारी पाहत उभे आहेत. यावेळी कोणीतरी त्यांचा व्हिडिओ शूट करतो, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
We want aazadi from Ghar ke kalesh this Independence day, till then enjoy this kalesh b/w a Husband and Wife on Railway station https://t.co/IEdfMnw2pc pic.twitter.com/1i4Bw9fAOk
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 13, 2023