Video: कहरच! बायको भडकली, नवऱ्याला गटरात बुडवून बुडवून मारला…

0
16

संसार म्हणजे भांड्याला भांड लागणार. नवरा बायकोत वाद- विवाद, मतभेद, रुसवे, फुगवे आलेच. पती- पत्नीमध्ये भांडण होणे काही नवीन नाही. पण ही भांडण अगदी काही क्षणाचीच असतात. पण अनेकदा नवरा- बायकोची ही भांडणं इतकी आक्राळविक्राळ रुप घेतात की पाहणारेही चक्रावून जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमधील नवरा- बायकोची भांडणं पाहून तुम्ही डोक्याला हात लावालं.या व्हायरल व्हिडिओमध्ये नवरा- बायकोची तुफान मारामारी सुरू असल्याचे दिसत आहे. धक्कादायक म्हणजे ही भांडणे इतकी वाढतात की रस्त्यावरुन थेट गरटापर्यंत पोहोचतात. गटरामध्ये पडूनही दोघेही भांडत असल्याचे दिसत आहे.