IAS पूजा सिंघल यांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी, नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन… व्हिडिओ

0
1468

झारखंड मध्ये अवैध उत्खननाप्रकरणी ईडीने शुक्रवारी सकाळी 5 च्या सुमारास देशभरात छापेमारी केली. ही कारवाई झारखंडच्या वरिष्ठ IAS अधिकारी पूजा सिंघल व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या 20 ठिकाणांवर करण्यात आली. त्यात सिंघल यांच्या निकटवर्तीय सीएच्या घरी तब्बल 25 कोटींची रोकड आढळल्याचे वृत्त आहे. ही रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांनी मशीन मागविल्या आहेत.

ईडीने मनरेगा घोटाळ्यातील एका प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. ईडीने या शपथपत्राद्वारे कोर्टापुढे झारखंडच्या खूंटी जिल्ह्यातील मनरेगातील 18.06 कोटींच्या घोटाळ्यावेळी पूजा सिंघल त्या ठिकाणी उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या असले स्पष्ट केले होते.