गेल्या काही काळात बिस्किटची भजी, मँगो मॅगी, आईस्क्रीम डोसा, पान बर्गर अशा अनेक विचित्र पदार्थांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. या यादीत आता आणखी एका अतरंगी पदार्थाचा भर पडली आहे. या पदार्थाला आईस्क्रीमची भजी असं म्हटलं जातं. ही भजी तयार करण्यासाठी सर्वात आधी विविध फ्लेवर्सच्या आईस्क्रीमची गोळे तयार करून घेतले. मग त्या गोळ्यांना बेसनमध्ये व्यवस्थित मिक्स केलं. आणि मग हे गोळे उकळत्या तेलात तळून काढले. बरं, आईस्क्रीम बर्फातून बाहेर काढताच काही मिनिटांमध्ये पार वितळून जातं. पण त्यावर तोडगा काढण्यासाठी यानं आईस्क्रीमला एकदा तांदळाच्या पिठात मिक्स केलं. जेणेकरून त्याची वितळण्याची प्रक्रिया काही सेकंदांसाठी रोखता येईल. मग लगेचच बेसनमध्ये मिक्स करून तळून काढलं.