दिल्ली सेवा विधायक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ते राज्यसभेत मंजुरीसाठी आले होते. त्यामुळे काँग्रेसकडून व्हिप जारी करण्यात आला होता. सोमवारी हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार होते, त्यामुळे काँग्रेसच्या सर्व खासदारांनी राज्यसभेत हजर राहण्याकरता हा व्हिप होता.
काँग्रेसने व्हिप काढल्याने पक्षाच्या भूमिकेचे समर्थन करण्याकरता आणि विधेयकाविरोधात मतदान करण्याकरता ९० वर्षीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राज्यसभेत उपस्थित राहिले होते. वयोमानामुळे ते व्हिलचेअरवरच बसून होते.
काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो शेअर केले आहेत. प्रामाणिकपणा आणि बचाव करणे अशा दोनच शब्दांत काँग्रेसने हे ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
Integrity Vs Escape pic.twitter.com/lWp7nO4tyX
— Congress (@INCIndia) August 7, 2023