Independence Day Offer..जिओच्या ग्राहकांना गिफ्ट, अमर्यादित कॉलिंगसह 5800 रुपयांच्या ऑफर्स

0
33

स्वातंत्र्य दिनानिमित्तदेखील जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लान आणला आहे.

अनेकांना दर महिन्याला रिचार्ज करायला आवडत नाही, अशा युजर्ससाठी रिलायन्स जिओने एक शानदार प्लान आणला आहे. ज्याची किंमत 2,999 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये, अमर्यादित कॉलिंग व्यतिरिक्त तुम्हाला इतर अनेक फायदे मिळणार आहेत. यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल्स, अमर्यादित डेटा आणि दररोज 100 एसएमएस मिळणार आहेत. याशिवाय जिओ कंपनीच्या सर्व अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळू शकणार आहे. एवढेच नव्हे तर जिओ कंपनी तुम्हाला 5800 रुपयांपर्यंच्या वेगवेगळ्या ऑफर्स देणार आहे.

स्विगी: या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 249 रुपये किंवा त्याहून अधिक खरेदीवर 100 रुपयांची सूट दिली जाईल.

यात्रा: ग्राहकांना फ्लाइट बुकिंगवर रु. 1500 आणि हॉटेल बुकिंगवर रु. 4000 पर्यंत सूट मिळते. पण यामध्ये किमान सवलतीची ऑफर नाही.

अजिओ: 999 रुपयांच्या या ऑफरमध्ये तुम्हाला 200 रुपयांची सवलत मिळते.

रिलायन्स डिजिटल: निवडक वस्तूंवर फ्लॅट 10% सवलत आहे आणि कोणतीही घरगुती वस्तू खरेदी केल्यास 10% सवलत आहे.