Video : तुमची दाढी करून देतो; पण मत द्या , प्रचारासाठी उमेदवारानं हाती घेतला वस्तारा

0
9

लोकसभा निवडणुकीत स्वत:चा प्रचार करणाऱ्या एका उमेदवाराने हाती वस्तारा घेत थेट मतदाराची दाढी करणं सुरू केलं. लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या एका उमेदवारानं आपला प्रचार करताना थेट मतदारांची दाढी करणं सुरू केलंय
लोकसभा निवडणुकीला सुरुवात झालीय. लोकांना लोकशाहीचे महत्त्व सांगितले जात आहे. मतदारांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोग मोहीम राबवत आहे. तर उमेदवार आपल्या पक्षाचा प्रचारात व्यस्त झालेत. अशात एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवाराने एका सलूनला भेट दिली. सलूनमध्ये शिरताच या उमेदवारानं हातात थेट वस्ताराच घेतला.

हा व्हिडिओ तामिळनाडूमधील आहे. तेथील अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार परिराजन रामेश्वरम यांचा आहे. त्यांनी एका सलूनला भेट दिली, तेथे जाऊन त्यांनी न्हावीची भूमिका घेतली. तेथे आलेल्या लोकांची दाढी आणि कटिंग करत त्यांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले.