दहावी उत्तीर्ण तरुणांना भारतीय पोस्टात नोकरीची संधी चालून आली आहे.
इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी बंपर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या भरतीद्वारे तब्बव 30 हजार 041 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 आणि कमाल वय 40 वर्षे असणे आवश्यक आहे. ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यावेळी गणित आणि इंग्रजी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय असावे.
उमेदवाराकडे माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.महिला/ट्रान्स-महिला उमेदवार आणि एससी/एसटी श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.
असा करा अर्ज
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जा.
होमपेजवर नोंदणी लिंकवर क्लिक करा.
नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसाठी पुढे क्लिक करा.
अर्ज शुल्क भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट काढा.
अर्जाची शेवटची तारीख
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना 23 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
omkar
omksr
Comments are closed.