हा व्हायरल व्हिडीओ एका चालत्या बसमधील आहे. एक तरुण बस ड्रायव्हरजवळ जातो आणि त्याला सांगतो की बसमध्ये कंडक्टर नाही. तेव्हा बसमधील इतर लोकही कंडक्टरला मागे पुढे पाहतात पण त्यांना कंडक्टर दिसत नही. नंतर बस ड्रायव्हरला कळून चुकते की तो कंडक्टरलाच विसरलाय. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की कंडक्टर एका व्यक्तीच्या दुचाकीवर बसून येतो आणि अर्ध्या रस्त्यात बस पकडतो.. कंडक्टर येताच थेट ड्रायव्हरजवळ जातो आणि त्याला जाब विचारतो. हे सर्व पाहून बसमधील प्रवासी हसायला लागतात.