एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक तरुण कोब्राच्या जवळ जाऊन त्याच्याशी मस्ती करण्याचा प्रयत्न करतो. पण काही सेकंदात नाग पिसाळतो अन् फणा मारतो. त्यानंतर जे काही घडतं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
खतरनाक कोब्राच्या या व्हिडीओनं इंटरनेटवर अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. इंडियन कोब्राच्या जवळ जाऊन एक तरुण त्याला स्पर्श करण्याची हिंम्मत करतो. पण काही सेकंदातच कोब्रा फणा काढून त्याला चावा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे. @therealtarzann नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर इंडियन कोब्राचा हा खतरनाक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.






