स्वागतावेळी कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार…व्हायरल व्हिडिओनंतर भारतीय क्रिकेट संघातील ‘हे’ खेळाडू ट्रोल…

0
26

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावस्कर मालिकेपूर्वी तयारी करत असलेला भारतीय क्रिकेट संघ ९ फेब्रुवारीला पहिल्या कसोटी सामन्याच्या आधी नागपुरात दाखल झाला. रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये चेक इन करताना भारतीय परंपरेनुसार, हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी त्यांच्या कपाळावर टिळा लावून संघाचे स्वागत केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटपटू आणि वेगवान जोडी उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज यांनी कपाळावर कुंकवाचा टिळा लावून घेण्यास नकार दिला. या दोघांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचे स्वागत हसून स्वीकारले परंतु त्यांच्या कपाळावर टिळा लावू नका असा हाताने इशारा केला. हे दोघेच नाही तर भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड हे सुद्धा टिळा लावून घेण्यास नाकारताना दिसले.