देश रक्षणाची अवघड वाट, गुडघाभर बर्फातून मार्गक्रमण करतात भारतीय जवान…व्हायरल व्हिडिओ

0
37

सध्या अशाच एका भारतीय जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो पाहून तुमची छाती अभिमानाने भरुन आल्याशिवाय राहणार नाही.

लष्करातील एक जवान गुडघाभर बर्फातून वाट काढत चालताना या व्हिडीओत दिसत आहे. गुडघाभर बर्फ असल्यामुळे या जवानाला पुढे जाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. मात्र, हा जवान परिस्थिला न जुमानता हिंमतीने रायफल घेऊन पुढे सरकताना दिसतं आहे. थोड्याशा थंडीने आपलं अंग थरथर कापत असताना आपले जवान देशाच्या रक्षणासाठी अशा शरीर गोठवणाऱ्या थंडीचा सामना करताना पाहून त्यांच्याबद्दलचा आदर दुप्पट झाला आहे.