IPL 2022…Gujrat Titans फायनलमध्ये… सामन्यानंतर मिलरने मागितली राजस्थान रॉयल्सची माफी

0
855

IPL 2022 Gujrat Titans
मुंबई : गुजरात टायटन्सनं आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुजरातनं पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सनं पराभव केला. मिलरनं या मॅचमध्ये 38 बॉलमध्ये नाबाद 68 रन केले. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 3 सिक्स लगावत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर मिलरनं खास ट्विट करत राजस्थान रॉयल्सची माफी मागितली आहे.

मिलर यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा सदस्य होता. त्याला आयपीएल 2020 मध्ये राजस्थाननं खरेदी केले होते. पण, त्यांनी त्याला पूर्ण संधी दिलीच नाही. त्याला या सिझनपूर्वी राजस्थाननं रिलीज केले होते. त्यामुळे राजस्थानवरील विजयानंतर मिलरनं त्याच्या माजी आयपीएल टीमची माफी मागितली आहे.
सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर हँडलनंही मिलरला उत्तर दिलं आहे. त्यांनी एक मिम शेअर करत ‘दुश्मन न करे दोस्त ने वह काम किया है’, असं ट्विट केलं आहे. मिलर आणि राजस्थान रॉयल्समध्ये झालेली सोशल मीडियावरील ही जुगलबंदी सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.